सध्या च्या स्थितीत कोणालाही हल्ली हा प्रष्न पडत नाही कि दारू म्हणजे काय रे ? दादा… याचं कारण, गावागावात, शहराषहरात, कोप-याकोप-यात देषी दारूची दुकाने, बार, पब्स,परमिटरूम, धाबे, अडड्े आहेते!
पुर्वी ज्या प्रमाणे दारूपिणं गैर मानंल जायचं तसं आता मानलं जात नाही. कित्येक आदिवासी समाजात दारू पिणं हा त्याच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग मानला जातो. तसा अनेक कुटूबामध्ये दारू हा जीवनषैलीचाच भाग बनुन राहिला आहे.
पार्टीज, वीकएंडस्, सुटटया, पिकनिक, मॅचेस, जत्रा, लग्नसंभारंभ, होळी, कोजागीरी पोर्णिमा,, महाषिवरात्र, 31 डिसंेबर असे दिवस हक्काचे, पिण्याचे दिवस म्हणुन समजले जातात.
ताणतणावुन मात करणे, राग, दुःख, भीती अषा त्रासदायक भावनांषी जुळवुन घेणे इत्यादी कारणांसाठी दारू पिली जाते.साहित्य, सिनेमा, नाटक, टिव्ही सिरीअल्स अषा सगळया माध्यमातुन सर्रारपणे दारू पिणारी माणसं आढळतात. क्रिकेटपटू विजयाचा जल्लोष करताना शॅम्पेन उघडतांना आढळतात.
मदिरा आणि मदिराक्षीचा संबध तर गहिरा आहे. त्यामुळेच जागोजागी लेडीजबार, डान्सबार, फुल्ल सव्र्हिस बारचं पेव होत. तमाषाचे रसिक ’लावल्याषिवाय’ बैठकिला जात नाहीत. जिजेतल्या वेष्यापासून उच्चभ्रु कालगर्लकडील ’महफिल’ मद्याषिवाय पुर्ण होत नाही.
धर्म, वंष, जात, लिंग असा कोणताही भेद मानला जात नाही.तात्पर्य सघ्या आपण मद्यसेवनाला मिळालेल्या मान्यतेच्य युगात वावरत आहोत.पण सघ्या काय म्हणायचं?…. अगदी महाभारतापासुन मद्य आहेच! श्रीमद्भागवतात, सर्व यादवांनी प्रचंड मद्यसेवन करून ’यादवी’ केल्याचा उल्लेख आहे. षिवाजी महाराजांली दारू पिण्यास बंदी घातल्याचे उल्लेख सापडतात. स्वातं़त्रपुर्व काळात महात्मा गाधींना दारू ही समस्या बाटल्याने त्यांना नषाबंदीचा जोरदार प्रचार करावासा वाटला.अगदी परावापरवापर्यत महिलांनी मंडळानी दारूबंदीसाठी आंदोलन केल्याचे दृष्य आहे.
आपल्या सर्वाना दारूचे अस्तीत्व मान्य करायलाच हवे. माणसाला वास्तवापासून दूर कल्पताच्या जगात जाण्याची जन्मजात उर्मी असते. अषीच उर्मी संकोच सोडून मोकळेपणाने वागण्याची असते. नषा ही अषी गोष्ट आहे की, जिथे जमीन सोडन चालता येतं, इतरांची फिकीर न करता बोलता येतं. काही क्षण वास्तवाला, वस्तुस्थितीला विसरता यंेत. आणि ही ओढच नषेच्या पदार्थाकडे, आकृष्ट करते. धुदीची ओढ! सुखाची ओढ!
दुःख टाळण्यासाठी, वेदना कमी करण्यासाठी ही माणस नषेकडे वळतात. नंिषल्या पदार्थाचे सेवन करतात. कोणत्याही माणसाला जगण्यासाठी नषेची गरज नसते. लोकांचे गैरसमज असतात. थंडिच्या प्रदेषातील लोकाना दारू लागतेच, सैन्यातल्या लोकांना दारू लागतेच, श्रमाचे काम करणा-यांना दारू लागतेच, मार्केटिंगमधल्यांना दारू लागते. सफाई कामगारांना दारू लागते वगैरे वगैरे.
या पृथ्वीतलावरच्या कोणत्याही माणसाला, निरोगी, आनंदी, अर्थपुर्ण आणि कृतीषिल जगण्यसाठी दारूची अजिबात, तिळमात्र गरज नसते. माणसं, परंपरेनुसार सुख वाढविण्यासाठी किवा दुःख कमी करण्यासाठी दारूची गरज निर्माण करतात. लक्षात घ्या, दारू ही माणसानं निर्माण केलेली गरज आहे. आणि जी गोष्ट माणसानं निर्माण केली आहे, ती गोष्ट माणसाला बदलता येते. दारू ही नैसर्गिक गरज नाही. म्हणनच दारू सुटू शकते. (दारूचा आजार आणि उपचार, मुक्तागण 06)
डाॅ. विनोद गजघाटे,
मधुर एकात्मिक व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र,
26 श्रमजीवीनगर, मानेवाडारोड, नागपूर-27