दारूचा पहिला घोट आणि नंतर घोटावर घोट…

प्रत्येक मद्यपीची व पहिल्या पेगची सुरूवात हि इतरांच्या (मित्रमंडळीबरोबर) मदतीनेच होते तीही फुकटातच.. आपल्या सर्वाना माहित असेल कि ’एकच प्याला’ या नाटकात सुधाकर देखील मानसिक दडपण आल्यामुळे दुःखी व बेचैन झाला होता. या अवस्थेत समोर ओलल्या एका दारूच्या प्याल्याने त्याचे सर्व दुःख विसरून त्याला व्यसनात अडकविले. ब-याच व्यक्ती अतिषय श्रमाचे काम करून थकवा घालविण्यासाठी दारू पितात तर काही स्पर्धायुक्त जीवनात मनःपुर्वक काम मिळविण्यसाठी दारूची लाच देतात ंिकवा घेतात याला ते ’’बिझानेस ड्रींेक’’ या शब्दाने संबोधन करतात. प्रत्येक मद्यपीची सुरूवात ही सर्वप्रथम महिना.पंधरा दिवसात एकदा, व्कचित पार्टीत, एन्जायकरण्यासाठी होत असते. आणि या व्यक्ती स्पष्टपणे सर्वाना संागतात की मी रेग्युलर ड्रिंकर नाही.

दारू पिल्याने शरिरावर दुष्परिणाम होतात म्हणुन हा व्यक्ती दुस-यांना आवर्जुन सांगते की मी दारू कोरडी घेत नाही, त्याबरोबर विविध खद्यपदार्थ घेत असतो. ’ती व्कचीत’ झालेली सुरूवात हळुहळु होळी, पोळा, 31 डिसंेबर, कधी आनंद प्रसंगी, ’’ सोषल ड्रींक’’ हे नाव देउन नियमित चालु राहते. सर्वसामान्यामध्ये असा समज आहे कि दारू हे उत्तेजित करणारे पेय आहे. त्यामळे एकप्रकारचा उत्याह टिकविण्यासाठी ते हे पेय घेउ लागतात आणि हळुवार याचे रूपांतर जिवनावष्यक घटकात कसे होते हे त्या व्यक्तीला कळतच नाही. जेव्हा रक्तात मद्याचे प्रमाण हे 0.1 टक्का असते तेव्हा त्या व्यक्तीला नषा येउ लागते. जेव्हा हे प्रमाण 0.5 टक्के वर जाते तेव्हा व्यक्तीचे संतुलन बिघडण्यास सुरूवात होते. जसेजसे याचे रक्तातील प्रमाण कमी होत जाते तसेेतसे त्याचा आनंद, उत्साह कमी होत जाते आणि तो टिकविण्यासाठी त्याची मद्यसेवनाची इच्ठा वाढत जाते. असे होेत असता काही व्यक्तीच्या मनात भीती निर्माण होते की मी मद्यपी तर होणार नाही! याकरिता ते काही दिवस ’ओले’ (सतत पिणे)तर काही दिवस ’कोरडे’ (दारू बंद करणे) असे करतात. काही कालावधीसाठी दारू बंद करताना माझे मद्यावर कसे नियत्रंण आहे हे स्वतःला व इतरांना सांगायचे असते.

या व्यक्तीतील अहंभाव हा आपण दारूडे होत आहो हे समजण्यास तयाार नसतो. त्याचे मद्यआकर्षण वाढत जाते आणि आयुष्यात येणा-या सर्वसामान्य समस्यांना तोंड देण्यास तो असमर्थ ठरतो आणि त्याचबरोबर शरिरातील दारूचे प्रमाण निंयत्रणात ठेवण्यासाठी एकसारखा सुर्योदयापासुन सुर्यास्तापर्यत सतत दारू घेत असतो. अषा वेळेस कुटूबांच्या सदस्याची चिडचिड ऐकुन तो म्हणु लागतो.

’हंगामा है क्य बरपा, थोडीसी पी ली है, डाका तो नही डाला, चोरी तो नही की है।’
असे म्हणत त्याला आता जिवंत राहण्यासाठी दारू पिणे जरूरी भासु लागते. दारूवर माझे नियत्रंण आहे असे म्हणणारा हा माणुस दारूच्या नियत्रंणाखाली कसा येतो हे त्यालाच कळत नाही….. या अवस्थेत शरीराकडुन दारूची तीव्र इच्छा, कुटूबांतील व्यक्तीकडुन तीव्र विरोध अषा अवस्थेत दारूकरिता खोटे बोलणे, चोरी करणे, मारहाण करणे असे कृत्य त्याच्या हातुन घडु लागते त्यामुळे कुटूबात आणि समाजात त्याची प्रतिष्टा गमावली जाते. त्याच्याव कुणचा विष्वास बसत नाही आणि हळुहळू हो एकटा पडु लागतो. अषा एकाकीपणामुळे त्याची व्यसनाधिनता अधिक वाढु लागते. त्याला समाज दारूडा म्हणु लागतो. मित्र अणि आप्तसंबधी लांेकाकडुन तो दुर जावु लागतो. घरातील वातावरण खिन्न, उदास आणि तणावपुर्ण असते. सुरवातीच्या काळात घरातील मंडळी व्ससन सुटावे म्हणुन पुजा-अर्चना, तप, उपास हे देखिल करायला लागतात. कुणीदेखील त्याच्या या आजारास समजु शकत नाही. त्याला स्वतःला समज सेईस्तोवर त्याच्या रक्तातील मद्याचे प्रमाण हे 0.55 टक्के पोहचत असते. आणि त्याच्या शरिराने अनेक विकारांना निमंत्रण दिले असते. त्याच्या लिव्हरच्या पेषी तंतुमय होतात. तरीही दारू पीत राहीलातर लिव्हरमधील पेषी मरायला लागतात आणि लिव्हर आकुंचन पावते. आकुचंन पावल्यामुळे अन्नपचनासाठी व उर्जा निर्मीतीसाठी लागणारी हजारो रसायने निर्माण कली जात नाहीत व अनेक विकार होतात. या अवस्थेला ’हिव्हर सो-होसिस’ म्हणतात. अषा वेळी लाखो रूपये खर्चुन यकृतरोपण करणे या व्यतीरिक्त उपाय नसतो. तसेच आतडयात पचनक्रिया चालु असतांना दारूमुळे आतील अस्तरांना व्रण पडतात, पोटात पाणि साटु लागते, रक्ताच्या उलटया, पायाला सुज, डोळयाचे पांढ-या रंगाचे पिवळया रंगात झालेले परिवर्तन, नखात झालेला बदल हा त्याला हळुवार मृत्यूषयेवर आणतो. दारू उष्ण असल्यामुळे मूळव्याध, भगेद्र असे विकार होतात. दारूतील रसायनामुळे किडनीवर परिणाम होतो. हे आपण दारू नेमकी आपल्या शरिरावर काय परिणाम करते पुढील लेखात.
व्यसनाच्या चक्रात अडकलेला एक तरूण मित्र. या व्यसनापायी त्याच्या शरिराचे तिन तेरा तर वाजलेच, पण त्याचा संसारही मोडकळीला आला. या व्यसनातून सुटण्यासाठी त्यानंे हरत-हेने प्रयत्न केले. अखेरचा प्रयत्न’ म्हणुन त्यानंे मधुर व्यसनमुक्ती केद्राला पत्र पाठवलं. केवळ गंमत, क्रेझ म्हणुन सुरू झालेला व्यसनाचा ’खेळ’ नंतर उग्र रूप धारण करतो आणि त्यातुन कसं बाहेर पडावं हेच कळत नाही. या तरूण मित्रासाठी….

’बाबा’ चा गंडा धोकादायकः-रूग्णाला व्यसनातुन बाहेर काढण्याच्या नादात आपण कुठल्या अंधश्रध्देला तर बळी पडत नाही ना याकडेही घरच्यानी आवर्जुन लक्ष दिले पाहिजे.
कुठल्याही बाबा ंिकंवा ’बुवां चे गंडेदोरे बांधुन काहीही उपयोग होत नाही.अनेकदा लोक नुसते डाॅक्टरकडे जाउन सलाईन लावुन आणतात. त्याचाही व्यसन सोडण्यासाठी उपयोग होत नाही. नव-यानी दारू सुटावी यासाठी बायकोने केलेला उपसा, व्रतवैल्य यामुळे उपयोग होत नाही.
सगळयात धोकादाक प्रकार म्हणजे व्यसनी माणसाच्या नकळत त्याच्या अन्नात मिसळायचं औषध, यामध्ये कधी कधी काहीच नसंते, पण बहुतेक वेळा त्यामध्ये एक अत्यंत धोकादायक रसायन असतो. ते औषध डाॅक्टर्सही खुप जपुन आणि अत्यंत टोकाच्या परिस्थितीत देतात. आणि हे औषध देण्यात, त्याच्या प्रमाणात ंिकवा त्याचे पथ्य पाळण्यात थोडी जरी चुक झाली तरी रूग्णाच्या जिवाला धोका उत्पन्न होउ शकतो. त्याची कुठलीही कल्पना हे औषध पुडीत बांधुन अंगारा म्हणुन देणा-यांना नसते. आणि त्यामुळेच असा अंगारा देणा-या लोकापासुन दुर राहणंच हिताचं ठरतं.

लक्षात घेण्यासारखी काही माहितीः जो माणुस व्यसन सोडण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या घरच्यानीही काही गोष्टी समजुन घेवुन त्याप्रमाणे प्रामाणिक वागणं आवष्यक आहे, व्यसन हा एक आजार आहे हे सगळयात आधी लक्षात घेउन मान्य केलं पाहिजे.व्यसन सोडविण्यासाठी योग्य उपचार खुप काळापर्यत द्यावा लागते. या उपचारामध्ये समुपदेषक किंवा मधुर व्यसनमुक्तीकेद्राची मदत घेतल्याचाही खुप उपयोग होउ शकतो. आपल्याकडे अनेक बायका नव-यालाच सर्वस्व मानतात. आणि तोच व्यसनाच्या आहारी गेला म्हटल्यावर त्या पूर्णपणे सैरभैर होउन जातात. अषावेळी या व्यसनामुळे कितीही त्रास होत असला तरी बायकोनं घराकडे, मुलांकडे आणि मुख्य म्हणजे स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. पुर्वीप्रमाणेच घरांबाहेर पडलं पाहिजे. लोकामध्ये मिसळलं पाहिजे. मुलांच्या आणि स्वतःच्याही खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करू नये. मुलांषी बोलुन, त्यांच्याषी संवाद साधुन घरातलं वातावरण शक्य तितकं आनंदी आणि चागलं ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि सगळयात महत्वाचं म्हणजे व्यसन सोडण्याच्या प्रयत्नाचं कौतुक केलं पाहिजे. व्यसनापासुन दुर राहण्याच्या रूग्णाला निग्रहाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. घरच्यांचा दृष्टीकोन जर सकारात्मक असेल तर व्यसन सोडणं तुलनेनं सोप जातं.

अषाच एका प्रषांतचेही म्हणने आहे की, तो फक्त गंमत म्हणुन, कंपनी म्हणुन कधीतरी मित्राबरोबर थोडीषी घेतो. खरं तर दारूपिणं हा शब्दही त्याला मान्य नव्हते. ’ड्रिक्स! ड्रिंक्स इज द प्रापर वर्ड! ’ मि काय गावठी पितो? नाही ना? मग दारू काय म्हणता?’ असं त्याचं म्हणणं दारू पिणारी माणसं पुढे जाउन दारूडे होउ शकतात, पण आपण तर डिंªक्स घेतो आणि आजकाल ड्रिंक्स घेणं कोणी व्यसन समजत नाही, असं त्याला त्यांच्या मित्रांनी समजावुन सांगीतलंे आणि त्यानेही अगदी छान समजून घेतल.

आठवडयातुन तिन-चार वेळा ड्रिंक्स घेणं म्हणजे काही फार नाही, इतपत तर सगळेच घेतात. फक्त आता प्रषांतचा प्राब्लेम असा व्हायला लागला की या ड्रिंक्स प्रकारासाठी त्याल घरून मिळणारा पाॅकेटमनी अजिबातच पुरत नव्हता. सुरवातीला त्याला एकाद्या पेगनेही छान रिॅलॅक्स वाटायचे, पण आता तीन पेगनंतरही ते फिंलींग त्याला येतच नाही. आधी तो आठवडयातुन कधीतरी एक-दोनदा मित्रांबरोबर बसायचा, तिथला माहौल या सगळयाचे थ्रिल वाटायचं. आता मात्र तो फार फार तर एक दिवसाआड जाण्याइतका दम धरू शकतो. खरं तर त्याला रोजच जायचं असते, पण जे जमत नाही. पैसे नसतात. कधी ध्ज्ञरातुन बाहेर पडायला प्राब्लेम येतो. कारण आता घरच्यानाही त्याच्याबद्ल ब-यापैकी संषय यायला लागले. तो कधी, कुठे, कोणाबरोबर, कषाला जातो याकडे त्यांचे हल्ली जरा जास्तच लक्ष असते. या सगळयामुळै जर सलग एक-दोन दिवस दारू मिळाली नाही, तर प्रषांत अक्षरषः सैरभैर होउन जातो. त्यांच कषातच लक्ष लागनास हांेत. भयंकर चिडचिड व्हायला लागते. कधी-कधी दरदरून घाम येतो आणि जाउन प्यायला मिळेपर्यत त्याच्या डोक्यात आता हे कसं जमवायचं? पैसे कसे मिळवायचे? घरी काय सांगायचे? ब्रॅण्डेड नाहीच परवडली, तर गावठी ट्राय करावी का? त्याचीही साॅलीड किक बसते म्हणतात. हे आणि असेच विचार येत राहतात. आणि तरीही त्याचं असंच म्हणण आहे की मी कधीतरी थोडीफार ड्रिंक्स घेतो. मी काही ’अॅडिक्ट’ नाही. आधि त्याच्या घरचेही असंच म्हणायचंे की, मित्राबरोबर कधीतरी कुठेतरी गेला असेल, तरूण वय आहे, एवढ काय त्यात! पण आता मात्र तेही घाबरलेत. आपला मुलगा दारूच्या विळख्यात पक्का अडकलाय हे त्याच्या लक्षात यायला लागले. व्यसनाधिनता, अॅडिक्षन, अल्कोहोलिक आणि दारूडा असे दुरवर दिसणारे शब्द अचानक स्वतःच्या मुलाच्या बाबतीत वापरण्याची वेळ त्याच्यावर आल्यामुळे आता यातून मुलाला बाहेर काढण्यासाठी जे त्याच्यापरिनं सगळे प्रयत्न करताहेत. ते त्याच्यावर लक्ष ठेवतात. वेळ मिळाला की त्याला शहाणपणाच्या चार गोष्टी सांगतात.

संधी मिळाली की त्याला या मार्गावर नेणा-या मित्रांच्या नावानं खडे फोडतात. एकदा त्यानी त्याल कुठल्याषा महाराजाच्या पायावर घालुन आणलं….पण या सगळयापासुन दुरावत चालला, तो अॅडिक्ट झाला हे त्यांना दिसतंय, पण आपण अॅडिक्ट झालोय हे मान्य करायला तो तयार नाही. आणि त्यांने ते मान्य जरी केले, तरी मुळ प्रष्न तसाच राहतो…..हे व्यसन सोडवायचे कसे?….व्यसन सोडता येते का?…..आणि मुळात व्यसन कषाला म्हणयचं? प्रषांतला असलेले व्यसन हे केवळ त्याच्या किंवा त्याच्या कुटंबियाचा प्रष्न एवढयापुरतीच हि समस्या मयादित राहिलेली नाही. व्यसनाच्या चक्रात अडकलेले अनेक प्रषांत आणि त्याला त्यातुन सोडविण्यासाठी झटत असलेले अनेक कुटूबिय आपल्या अवतीभोवती सातत्यांने दिसत असतात. या विळख्यातुन त्यांना कसे सोडवायचे असाच प्रष्न सा-यासमोर पडलेला असतो.

व्यसन म्हणजे काय?: व्यसन हा एक शारिरिक, मानसिक आणि खरं म्हणजे कौटुबिक आजार आहे. कारण व्यसनाचे परिणाम त्या पेषंटच्या शरिरावर, मनावर आणि सपुर्ण कुटूंबावर होतात. व्यसनामध्ये व्यसनी माणुस (पंेषट त्या व्यसनावर, त्या वस्तुवर पुर्णपणे अवलंबुन राहायला लागतो). व्यसनामुळे त्याचे सर्व आयुष्य डिस्टर्ब होउन जातं….त्याच्या घरच्यानांही व्यसन मंजुर नसतं आणि त्याचा त्यांना त्रासही होत असतो….व्यसनाचे सगळयात मोठे वैषिष्टे म्हणजे त्याचं प्रमाण कधीही कायम रहात नाही… ते कायम वाढतच जाते, कारण शरिराचा टाॅलरन्स वाढलेला असतो.

व्यसन सोडताना दिसणारी लक्षणेंः शरीराला व्यसनाची सवय लागली असल्यामुळे व्यसन सोडून देण्याच्या काळात अनेक शरिरिक, मानसिक लक्षण दिसतात. पेषंटला त्याचा त्रासही होतो. मात्र ही सर्व लक्षणे तात्पुरती असतात हे लक्षात घेउन त्याकडे दुर्लक्ष करणे आवष्यक असते. षिवाय या लक्षणाचा त्रास होउनये यासाठी मधुर व्यसनमुक्ती केद्र आपल्याला मदत करू शकते हे पेषंटनी लक्षात ठेवायला पाहिजे.
लक्षणे-हातपाय थरथरणं, डायरिया, उलटया होण,े फिटस् येणे, भुख न लागणे, झोन न येणे, अंगावरचे केस उभे होणे, खुप थंडी वाजणे, खुप घाम येणे, कधी कधी दिसत नसलेल्या वस्तु पाहणे, कधी कोणी तरी मारायला येत आहेत, भिती निर्माण होणे गळयात कोरड पडणे इत्यादी… व्यसन सोडतांना अषी अनेक लक्षणे दिसु शकतात. पण असं जरी असलंे, तरी व्यसन सोडणे शक्य आहे. आजवर आम्ही मधुर व्यसनमुक्ती केंद्रामध्ये येणारे अनेक रूग्ण व्यसनमुक्त झाल्याचे बघत आहोत. मात्र त्यासाठी ठरवुन सातत्यांन आणि योग्य ते प्रयत्न करावे लागतात.(दारूचा आजार आणि उपचार, मुक्तागण 06)

डाॅ. विनोद गजघाटे,
मधुर एकात्मिक व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र,
26 श्रमजीवीनगर, मानेवाडारोड, नागपूर-27 मोबा. 09370276826

ESSM Rehab - MADHUR & MADHURANGAN © 2021 All rights reserved.
Design & Developed by Nagpur Website Design

Total Visitors: counter free

WhatsApp chat