- This event has passed.
कोणत्याही व्यसनापासून व्यसनमुक्ती शक्य आहे – डाॅ. विनोद गजघाटे
January 31, 2012 @ 8:00 am - 5:00 pm
कोणत्याही व्यसनापासून व्यसनमुक्ती शक्य आहे – डाॅ. विनोद गजघाटे
वार्ताहर/प्रतिनिधित्व: महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती परिषद आयोजित राज्यस्तरीय व्यसनमुक्ती कार्यशाळा व राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान सोहळा गुरुवार 31 डिसेंबर रोजी व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र येरमाळा येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमा प्रसंगी डॉ विनोद गजघाटे यांनी व्यसनमुक्ती शक्य आहे…परंतु कोणतेही व्यसन करणाऱ्या व्यक्तीने व्यसन करीत असल्याचे मान्य केले पाहिजेत. तसेच त्यांनी एक टक्के व्यसनमुक्त होण्यास इच्छुक असल्यास निश्चितच कोणत्याही व्यसनाधीन व्यक्ती व्यसनमुक्त होते. हे करण्यासाठी समुपदेशन आणि डॉक्टर आवश्यक असल्याचे डॉक्टर विनोद गजघाटे पुरस्कार सन्मान प्रसंगी बोलत होते.
डॉक्टर विनोद गजघाटे डॉक्टर आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय नागपूर चे प्राचार्य असून मधुर एकात्मिक व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्राचे संचालक आहेत. आता पर्यंत त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यसनमुक्ती अभियानांतर्गत कार्य करीत आहेत.
‘व्यसनमुक्ती विषयक उपक्रम’ व ‘व्यसनमुक्ती उपचार पद्धती’ या विषयावर महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर संदीप तांबारे व डॉक्टर विनोद गजघाटे यांनी सखोल चर्चा करून मार्गदर्शन केले.
डॉक्टर विनोद गजघाटे यांची सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन व्दारा राज्य पुरस्कार प्राप्त आहेत तसेच श्रीलंकेत व्यसनमुक्ती अभियानांतर्गत व्यसनमुक्तीचे योगदान दिल्याबद्दल तेथील मंत्रालयाने दखल घेऊन एक लाख रूपये व पुरस्कार दिला. हा पुरस्कार मिळाल्यामुळे डॉक्टर विनोद गजघाटे यांना नशा मुक्त भारत अभियानासाठी सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार ने नियुक्तीपत्र दिले आहे.
व्यसनमुक्ती क्षेत्रात मागील विस वर्षापासून कार्यरत असून 3427 लोकांना वेगवेगळ्या व्यसनातून मुक्त केले आहे.
तर द्वितीय सत्रात ‘व्यसनमुक्ती कार्यात व्यसनमुक्ती क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या 74 जणांना ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी कार्यक्रमासाठी पाठविलेल्या शुभ संदेशाचे वाचन करण्यात आले. ङकार्यक्रमाची प्रस्तावना महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती परिषदेचे सचिव अजिनाथ शेरकर यांनी केले तर आभार डॉक्टर रेवती घाडगे यांनी आभार मानले.
भारत नशामुक्त अभियानात सहभागी होण्यासाठी www.essmrehab.org यावर नाव नोंदवून घेण्याचे आवाहन केले आहे
आपल्या लोकप्रिय वर्तमानपत्रात ही बातमी प्रकाशित करून सहकार्य करावे ही नम्र विनंती.
आपलाच डॉ. विनोद गजघाटे, संचालक मधुर एकात्मिक व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्र नागपूर -27