- This event has passed.
डाॅ. विनोद गजघाटे जेष्ठ नागरिक व राज्य व्यसनमुक्ती सेवादूत पुरस्करा ने सन्मानित
October 1, 2022 @ 8:00 am - 5:00 pm
डाॅ. विनोद गजघाटे जेष्ठ नागरिक व राज्य व्यसनमुक्ती सेवादूत पुरस्करा ने सन्मानित
1 ऑक्टोबर जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्त जेष्ठ नागरिक व जेष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या संस्थाचा सत्कार व गौरव कार्यक्रम घेण्यात आला यांत डॉ विनोद गजघाटे सर यांचा सत्कार करण्यात आला.
‘’जागतिक जेष्ठ नागरिक दिवसानिमित्ताने एकात्मता सामाजिक शिक्षण मंडळ नागपूर द्वारा संचालित मधुरांगन वयोवृद्ध डिमेंशिया केयर सेंटर येथे “जागतिक जेष्ठ नागरिक दिवस” साजरा करण्यात आले त्या निमित्ताने डॉ विनोद गजघाटे, संचालक व प्राध्यापक डॉ आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय यांनी जेष्ठाना मोलाचे मार्गदर्शन केले त्यावेळी विशेष म्हणजे स्वतःला निवृत्त करू नका कोणत्याही कामात व्यस्त ठेवून नियमित व्यायाम आणि विशेष पोषक आहार घेतल्यास अल्झायमर सारखे आजार होणार नाही.
तसेच मा . जिल्हा अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जेष्ठ नागरिकांना यथासंभव मदत करा आणि प्रत्येक महिन्यात सर्व विभागाच्या मदतीने त्याचा समस्या सोडविल्या जातील असे आस्वासीत केले. जेस्टाच्या उपस्तितीत वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण डॉ सिद्धार्थ गायकवाड यांनी जेस्टाना येणाऱ्या समस्या बाबतीत मार्गदर्शन केले.
समाज कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने “जागतिक जेष्ठ नागरिक दिवस” च्या दिवसानिमित्ताने सामाजिक क्षेत्रात जेष्टासाठी उपयुक्त व मोलाचे कार्याबाबत डॉ. विनोद गजघाटे यांचा डॉ. विपीन इटनकर जिल्हाधिकारी नागपूर यांनी सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात मधुरांगणच्या संचालिका रोशनी जोगे, मनोज गोडे, समुपदेशक मंगेश राऊत , समाजकर्ते कार्तिक मसराम, निधी लोखंडे, कपिल वर्मा, श्रावणी गजघाटे , प्रकल्प संचालक पल्लवी मोट्या संख्येने जेष्ठ नागरिक जिल्हा समाज कल्याण किशोर भोयर जी. प. समाज कल्याण सभापती नेमावली माटे, शिक्षण सभापती मालतीपाटील उपस्तित होते. सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी आभार मानले.