व्यसनमुक्तीचा कानमंत्र

भारत सरकार पुरकृत ‘‘मधुर व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र’’ हि संस्था मागील दहा वर्षापासुन सर्व प्रकारच्या व्यसनावर उपचार करित आहे. आता पर्यत संस्थेत वेगवेगळया प्रकारची नषा करणारे आंतररूग्ण 2826 व बाहयरूग्णामध्ये 5273 आले आहेत. जसे तोंडाणे पिणे, खाणे किंवा ओढणे, नाकाने सुंगणे, त्याच प्रमाणे हातावर किंवा जांगेत इंजेक्सन लावुण नषा करित असलेल्या रूग्णांवर सफल प्रयोग करण्याात आले. त्यात दारू, गांजा, भांग, चरस, कोकिन, स्मॅक, ब्राॅउनसुगर, व्हाईटनर, आयोडेक्स, थिनर, पेट्रोल, कफसिरप, बोनफिक्स, स्नेकबाईट, पालेला मारून वाळवुन चिलम ंिकंवा सिगारेटमध्ये ओढणे त्याचप्रमाणेे दिवसभर पायात मोजे घालुन गंधे झालेले मोजे रात्रभर पाण्यात भिजवुन सकाळी ते पाणी गाळुन पिणे व तंबाखु, गुटखा, बिडी, सिगारेट इत्यादी.
स्ंास्थेचे मुख्य उद्देष सर्व प्रकारच्या व्यसनावर उपचार करून पुनर्वसन करणे, त्याचप्रमाणे कौटूबिक, सामाजिक व व्यसनाच्या आजारापासुन बचाव करण्याचा मधुर कानमंत्र दिल्या जाते. संस्थेची विषेतः संस्थेत एकुण 20 खाटाचे सुसज्जीत व आवष्यक सुविधायुक्त हाॅस्पीटल, स्त्रि-पुरूषासाठी वेगवेगळी व्यवस्था, वेळोवेळी व्यसनमुक्त झालेल्या लोकांचे मार्गदर्षन, तज्ञ व अनुभवी लोकांचेही आध्यात्मीक मार्गदर्षन दिल्या जाते. मनोबल वाढविण्यासाठी टि.व्ही, विडीओ, प्रदर्षनी, व्यसनामुक्तीवर आधारीत लायब्ररी, अनुभवी लोकांचे मनोगत, अल्कोहाॅलीक अॅनानिमस्सची साथ , अॅनालामची सभेचे आयोजन, ध्यानसाधना, योगासन, सत्सग, हास्य, मौन हिप्नोटाईज, अॅक्युपंचर थेरेपीध्दारा उपचार व मनोबर वाढविल्या जाते. हे सर्व कार्य डाॅ. विनोद गजघाटे, व त्यांच्या चमुमध्ये वैद्यकिय अधिकारी, मानसोपचार तज्ञ, समुपदेषक वार्डबाॅय, नर्स, योगाटिचर, च्या मदतीने वैयक्तीक, पारिवारिक, सामाजिक व व्यावसायीक मार्गदर्षन केल्या जाते. हा उपचार व्यसनी व्यक्तीचे निर्वीसिकरण करून वैद्यकिय तपासण्या करून औषधोपचार केल्या जाते. या एकंदर उपचाराने कसाही व्यसनाधिन रूग्ण व्यसनमुक्त जिवन जगत असतो.
काय आपण किवा आपल्या घरी, शेजारी व्यसनाच्या आजाराने ग्रसित आहेत? तर त्याला सांगा कि यावरही उपचार होउ शकतो त्यासाठी निर्धार पक्का करून व्यसनमुक्त जिवन जगण्यास मदत मिळु शकते. त्यासाठी व्यसनी व्यक्तीने फक्त स्वतःसी इमानदारी आणि प्रेम करणे आवष्यक आहे.

कारण व्यसन करणे हा एक आजार आहे. हे ॅभ्व् व तज्ञ लोाकानीही सिध्द केेले आहे. व्यसनकरणे आजार आहे तर त्यावर उपचार तर होणारच. म्हणुन उपचाराच्या आधी व्यसन करणे हा आजार कसा हे समजुन घेतले पाहीजे, त्याची काय लक्षणे असतात, हा आजार कोणत्या व्हायरसमुळे होतो, नषा हि शान मध्ये कसी परिवर्तीत होते आणि त्यावर कोणत्याप्रकारचा उपचार व कोणत्याप्रकारचा अॅन्टी डोस घेतले पाहीजे.

नषा हि काही लोक शानदाखविण्यासाठी, इमेज बनविण्यासाठी, थकवा भागविण्यासाठी, रात्रीची झोप चांगली येण्यासाठी, माणपान करण्यासाठी, बोलण्याचे धाडस निर्माण करण्यासाठी, कुणाला मारण्यासाठी, हिंम्मत तयार करण्यासाठी, भरपुर जेवण होण्यासाठी, कुणी रात्रीची गरज (हवस) पुर्णकरण्यासाठी, कुणी टाॅनिक म्हणुन तर कुणी मानसिक समाधानासाठी, नषा हि कोणत्या ना कोणत्या प्रकारात करित असतात.. बरं असो. हयाचा परिणाम अगदी उलट होतो बरं का. एखादया मद्यपीने सांगावे कि यापैकि मद्यपास केल्याणे हे फायदे झाले. सांगेलही परंतु ही सर्व मद्यपीच्या पळवाटा आहेत.

आपण रोज न्युज चॅनेलवरून, वर्तमानपत्रात, तर कधी काळी डोळयासमोर, आपल्या घरी, शेजारी वाचत ंिकवा बघत असतो दारूच्या छळामुळे पत्नीची आत्महत्या, घटस्फोट, दुस-यासोबत पळुन गेली, दारूच्या धुदित सुनेवर, स्वतःच्या मुलीवर बलात्कार, रस्त्याने जाणा-या मुलीची छेडखानी, दारूच्या नसेत मुलांने बापाला कु-हाडीने मारले, भावाने भावाचा खुन केला, दारूच्या नसेत गाडी चालवुन 14 ठार, 10 जन मृत्युच्या वाटेवर, मोटारसायकल बेधंद चालवुन पुलावरून पडुन जागीच ठार…… रोजच्या रोज अषा बातम्या वाचायला सरसावलेले आपले मन दारू या मानसिक व सामाजिक आजारासी दोन हात करायला, त्या समुळ खात्मा करायला अजुनही आपले मन ग्वाही न देता कचरते, न स्विकारता घाबरत आहे. हे दुर्देवी स्थिती आहे. दारूचे दुकान उघडले जावु नये म्हणुन झालेल्या मतदानात मतदान कमी झाल्याने दारूच्या दुकानाला परवानगी दिल्या जाते…असो आपल्याला दारूचे दुकान बंद करायचे नाही तर व्यसन करणे हा आजार आहे हा आजार कसे व यावर उपचार काय हे आपणास समोर जसे वाचत जाणार तसेच उत्तर मिळत जाईल आणि उत्तर मिळाले कि आजारातुनही मुक्ती मिळत राहील हे नक्की परंतु आधी सांगीतले त्या प्रमाणे वागायला पाहिजे.

कोणत्याही घरात रोजच्या दारूच्या अतीप्रासनामुळे त्याच्यासोबत तिरस्काराची वागणुक वा त्याची हकालपटटी हा एकमेव मार्ग प्रत्येक कुटूबांत अवलंबिल्या जातो. कारण तोच मार्ग सोयीस्कर वाटत असतो. दारूची नषा वाईट असुनही त्याला लागलेले व्यसन सुटत नाही. हि बाब आष्चर्य व चिंताजनक ठरते. दारू ही कुठल्याही कारणासाठी सुरू झालेली असो, दारू पिणे हे जेव्हा व्यसनात रूंपातरीत होते तेव्हा त्याचा परिणाम त्या व्यक्तीबरोबर अनेकांवर होतो. त्याचे शारिरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक स्तरावर नुकसान होते.

दारू पितांना ज्या व्यक्तीला आपण कुठे थांबायचे हे समजत नाही किंवा समजल्यानंतरही तो स्वतःला थांबवु शकत नाही अषा वेळी त्याला खरं तर प्रेम व सातत्याने मदतीची गरज असते. कारण त्यावेळी तो स्वतःला पंगु समजत असतो. जेव्हा अषा मद्यपी व्यक्तीला तु दारू पिउ नकोस, असे बजावले जाते किंवा सक्ती केली जाते कि तु यानंतर कोणत्याही प्रकारचे मद्यप्रासन केल्यास तुला घरातुन हाकलुन देउ, तुला घरात घेणार नाही, तुझे तोंड दाखवु नकोस, किंवा त-हे.. त-हेच्या ताकिद ंिदल्या जातात. त्यामुळे त्याला आपण पंगु आहोत आपल्याला कोणचीही मदत नाही. एकंदर सवयीमुळे त्याच्यातील डिनाईल फॅक्टर, संकेची भावना जागृत होते. म्हणजेच कळते पण वळत नाही. त्यानंतर तोच गूमान ऐकायला लागतो, तर कधी उदाहरण दयायला लागतो कि मि केव्हाही दारू सोडु शकतो… ते माझा मनावर आहे…, मि त्याच्या सारखा पित नाही तो जसा दारू पिउन नालीत, गटारात पडुन राहतो…, होस आल्यावर खिषातील पैसे, घडयाळ, किमतीवस्तु चोरी गेल्यात…., सायकल गेली…, त्याच्या सारखा पिउन बायकोला, आईला मारत नाही…, सिव्यादेत बडबड करित येत नाही…., माझी एवढी काही पत गेली नाही…., त्याची जसी झाली आहे, अजुनही लोक माझी ऐकतात, विचारतात, मानतात…., मि पितो तर चुपचाप येवुन झोपतो कुणालाही काही म्हणत नाही, मुलाबाळाकडे लक्ष ठेवतो…., घरातील गरजा पुर्ण करतो,…..वैगेरे. यामुळे त्याला दारू सोड म्हणनेच चुकीचे ठरते कारण रोजच्या पिण्यामुळे त्याचे कुटूंिबय व नातेवाईक, मित्र मंडळी त्याच्यापिण्यापायी व पिण्यामुळे निर्माण होणा-या अन्य त्रासामुळे इतके वैतागलेेले असतात की त्यांना त्याच्याषी प्रेमळपणे वागले पाहिजे हे पटतच नाही. त्याच्याषी भांडण किंवा रागाणे बोलुनच करवुन घेणेच त्याचा स्थायीभाव होत जातो. त्यामुळे सर्वच मामला अधिकाधिक बिघडत जातो. ही कधिही न संपणारी साखळी तयार होत जाते.

या साखळीला तोडून व्यसनी व्यक्तीला व्यसनमुक्त करायचे असेल तर रोजचे प्रतिबिब, बा-या पाय-या, बारा रूढी बरोबरच शारिरिक व मानसिक सुदृढ व व्यसनमुक्त जिवनाचे अनुभव यात राहतील. जर तुम्ही ठाम निष्चय केला आणि त्याला प्रयत्नाची तितकीच साथ दिली तर हे साध्य होउ शकेल. असे अनेकजन व्यसनमुक्त झालेले आहेत या लेखात व्यक्ती व समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी मदतीच्या उद्देषाने व्यसनमुक्तीच्या चळवळीत आपल्या सहाकार्य आवष्यक आहे. कारण व्यसन व्यक्तीगत आजार नसुन मानसिक, शारीरिक, कौटूंबिक व सामाजिक आजार आहे. म्हणुन हया आजाराला परावृत्त करू तसेच व्यसनी व्यक्तीना व्यसनमुक्त करण्यास प्रयत्न करू.

डाॅ. विनोद गजघाटे,
मधुर एकात्मिक व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र, 26 श्रमजीवीनगर, मानेवाडारोड, नागपूर-27 मोबा. 09370276826

ESSM Rehab - MADHUR & MADHURANGAN © 2021 All rights reserved.
Design & Developed by Nagpur Website Design

Total Visitors: counter free

WhatsApp chat