दारू नेमकी शरिरात काय करते?

दारूचा पहिला पेग तोंडात घेतल्यानंतर ती पोटात जाते नंतर हळूहळू रक्तात मिसळते आणि मेंदपर्यत पोहचते, मेंदुत पोहचल्यावर प्रथम मेंदुच्या मागील भागावर ज्याला हायपोथलॅस म्हणतात त्या भागावर प्रभाव टाकते. त्यामुळे भावना प्रदीप्त होतात. आनंद असेल तर आनंद वाढतो, उत्साह वाढल्यासारखे वाटते. मग दारूचा असर मेंदुच्या पुढच्या भागावर होतो. ज्याला फ्रंटल लोब्स म्हणतात. या भागात दारू गेल्यावर सारासार विचार आणि न्यायबुध्दी या संस्थेचे कार्य ढिले होते. मग माणसाचा संकोच संपतो. काय बोलावं अणि काय बोलु नये याचं भान संपते. आपण नेमके कुठे आहेात, आपल्या आसपास कोण आहे याचं भान राहात नाही. जीभ जड होते, स्वरावर नियत्रंण राहात नाही. शरिराच्या हालचाली मंदावतात, झोप येउ लागते अणि माणूस बेषंुध्द होउ शकतो.
दारू ओठातुन आत जातांना, तिच्या तीव्र अल्कली गुणधर्मामुळे तोंडाच्या आतील भागावर जो नाजुक भाग असतो त्यावर परिणाम करते. जिभेवर ’चव’ समजणारी यंत्रणा असते त्याच्यावर परिणाम होतो व ’चव’ समजण्याची क्षमता कमी होते. नेहमी दारू पिणारी माणसं अधिक मसालेदार, अधिक तिखट, अधिक गोड खातात कारण त्यांना सौम्य चवीची जाणीवच होत नाही.
दारू अन्ननलिकेत षिरल्यावर अन्ननलिकेच्या अस्तरावर परिणाम करते व अन्ननलिकेला जखमा होतात. अन्ननलिकतुन ती आतडयात पचनासाठी पोहचते. दारूचे पचन करण्यासाठी यकृताला विषेष रसायनाची वेगाने निर्मीती करावी लागते. माणूस जर सातत्याने दारू पीत राहिला तर, अषा रसायनाच्या निर्मीतीसाठी यकृताला, लिव्हरला जादा मेहनत करावी लागते. जादा काम केल्यामुळे हिव्हरला संूज येते. तरिही माणूस दारू पीत राहिला तर लिव्हरमधील पेषी मरायला लागतात आणि लिव्हर आकुंचन पावते. आकुचंन पावल्यामुळे अन्नपचनासाठी व उर्जा निर्मीतीसाठी लागणारी हजारो रसायने निर्माण कली जात नाहीत व अनेक विकार होतात. या अवस्थेला ’हिव्हर सो-होसिस’ म्हणतात. अषा वेळी लाखो रूपये खर्चुन यकृतरोपण करणे या व्यतीरिक्त उपाय नसतो. तसेच आतडयात पचनक्रिया चालु असतांना दारूमुळे आतील अस्तरांना व्रण पडतात, पोटात पाणि साटु लागते, रक्ताच्या उलटया, पायाला सुज, डोळयाचे पांढ-या रंगाचे पिवळया रंगात झालेले परिवर्तन, नखात झालेला बदल हा त्याला हळुवार मृत्यूषयेवर आणतो. दारू उष्ण असल्यामुळे मूळव्याध, भगेद्र असे विकार होतात. दारूतील रसायनामुळे किडनीवर परिणाम होतो
दारू पिल्यबरोबर माणसाचा रक्तदाब वाढतो, रक्तदाब वाढल्यामुळे हदयावर ताण येतो. हदयविकाराची शक्यता वाढते. दारूचा परिणाम मज्जासंस्थेवर होतो. त्यामळे शरिराच्या संपुर्ण त्वचेची संवेदनक्षमता कमी होते. त्यामुळे हातापायांना मुंग्या येणे, पावलेबधीर होणे, ंिलंगाचे उत्थापन न होणे या सारख्या गोष्टी घडतात.

मेंदूवर असर पडल्यामुळे लैगिक क्षमतावर परिणाम होतो. नपुसकत्व आणि वंध्यत्व या दारू पिणा-यामध्ये आढळणा-या नेहमीच्या बाबी आहेत. दारू ही ’डिप्रेसन्ट’ निराषावर्धक आहे. त्यामुळे औदासिन्य, चिताविकार असे आजार उद्भवू शकतात.

अषी शरिरातील एकही पेषी नाही ज्यावर दारू परिणाम करित नाही.

दारू पिणा-या माणसाना याचा त्रास होत असतो. मग प्रष्न पडतो की, दारू पिण वाईट आहे, दारूने शरिराला त्रास होत आहे, घरातील शांती विस्कळीत होत आहे. पैसे खर्च होत आहेत, हे सगळ सगळं माहित असून सुध्दा माणसं दारू का पीत राहतात? हे पुढील लेखात…….

डाॅ. विनोद गजघाटे,
मधुर एकात्मिक व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र,
26 श्रमजीवीनगर, मानेवाडारोड, नागपूर-27 मोबा. 09370276826

ESSM Rehab - MADHUR & MADHURANGAN © 2021 All rights reserved.
Design & Developed by Nagpur Website Design

Total Visitors: counter free

WhatsApp chat