जेष्ठानी मेंदूला रिटायर करू नकाः डाॅ विनोद गजघाटे

जागतीक अल्झायमर अर्थात डिमेंन्सिया दिना निमीत्ताने एकात्मता सामाजिक षिक्षण मंडळ, नागपूर व्दारा संचालीत मधुरांगन डे केअर सेंटर व सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या संयुक्ती विद्यमाने आजच्या कार्यक्रमात जेष्ठ नागरिंकानी निवृत्त झाल्यांनंतर आपल्या मेंदूलाही रिटायर करू नका. असा सल्ला डाॅ. विनोद गजघाटे यांनी व तज्ञांनी दिला हयाच अल्झायमरला दूर ठेवण्याचा उत्तम मार्ग आहे.

कारण वाढत्या वयात मेंदूची योग्य काळजी घेतल्यास अल्झायमरचा धोका निष्चितच कमी करू शकतो असा विष्वास मेंदूरोग तज्ञ डाॅ. ठाकरे व डाॅ. नगराळे यांनी दिला. मानसिक स्वास्थ चांगले ठेवणे आणि ताणतणाव मुक्त आयुष्य जगणे यातून अल्झायमर दूर ठेवता येईल असाही सल्ला मधुरांगणच्या डाॅक्टरांनी दिला.

ताणतणावामुळे मेंदूला क्षीण येते त्यातून मेंदूचा काही भाग आकुचंन पावतो व त्याचा परिणाम मेंदूला रक्तपुरवठा करणाÚया नसांवारही होतो. त्याचाच दुषःपरिणाम म्हणजे अल्झायमर. यापासून दूर राहायचे असेल तर ताणतणावाचे व्यवस्थापन करणे आवष्यक आहे. डाॅक्टरांनी हा आजार वयस्क लोकांमध्ये आढळतो, फारच क्वचित तरूणांमध्ये दिसून येतो. मेंदूची लक्षात ठेवण्याच्या भागाची झीज होते त्यातून रूग्णाला विस्मृती होते. देषात जेष्टाची संख्या वाढत आहे. त्यामुळे डिमेंन्सियाचे निदान होण्याचे प्रमाण देखिल वाढत आहे. पूर्वी वयोमानानुसार विस्मरण होत होते असे म्हटले जाते.

आध्ूानिक काळात या रोगावर प्रभावी औषधे उपलब्ध आहेत पण त्याहीपेक्षा या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी जेष्ठ नागरिकांनी लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी निवृत्तीनंतरही आपल्या मेंदूला ‘रिटायर’ करू नका. मधुरांगण मध्ये येणाÚया लाभाथ्र्याना कोणत्या ना कोणत्या कामात गुतवून ठेवावे लागते तसेच रक्तातील रक्तदाब, साखरेचे प्रमाण नियत्रीत ठेवून या आजाराला दूर ठेवू शकतो असे संचालक डाॅ. विनोद गजघाटे यांनी सांगीतले.

मध्ुारांगण मध्ये अल्झायमर टाळण्यासाठी समुपदेषक मिनाक्षी गजभिये, कु. षिल्पा पिल्लेवान, संदिप मेश्राम कु. प्रियंका मेश्राम यांनी ताणतणाचे व्यवस्थापन, योग्य पोषक आहार, योग्य प्रमाणात झोप व नियीमत व्यायाम करवून घेत असतात. कार्यक्रमाचे आभार दिक्षा गायकवाड यांनी केले. बहसंख्येने जेष्ठ नागरिक उपस्थित होते. त्यांना डाॅ. विनोद गजघाटे यांनी निषुल्क उपचार घेण्याचे आव्हाहन केले

ESSM Rehab - MADHUR & MADHURANGAN © 2021 All rights reserved.
Design & Developed by Nagpur Website Design

Total Visitors: counter free

WhatsApp chat