इंटरनेटचे व्यसन लागले आहे का?

 

इंटरनेट किंवा स्मार्टफोन वापरायचे व्यसन लागते म्हणजे काय, त्यावर वैद्यकीयदृश्टया नेमके कोणते उपाय करणे गरजेचे आहे, ही गोश्ट व्यक्तीपरत्वे बदलत जाणारी आहे. हे व्यसन टाळायचे असेल, तर या गोश्टीच्या वापरावर नियत्रंण आणणे सर्वात महत्वाचे आहे.

परवाच काही मित्रांषी गप्पा मारत होतो. बोलता बोलता आमच्यातील काही जणांनी पटकन मोबाईलवर ओझरती का होईना नजर टाकल्याची नोंद माझ्या मनाने घेतली. कळत न कळत या गोश्टीवर विचार करतांना जाणवले, की आपल्यापैकी बहुसंख्यजण एकमेकांसी बोलतांना झटक्यात मोबाईलवरची नोटीफीकेषन्स पाहतात. अगदी घरातसुध्दा आपण मोबाईलचा वापर करतो. व्हाॅट्स ऍप, फेसबुक या गोश्टी अनेकांसाठी अविभाज्य झाल्या आहेत. इतकेच कषाला, अनेक पालकांनी बोलतांना पालकही मुलांच्या मोबाईच्या अतिरीक्त वापराबदद्ल चिंतेत असल्याचे दिसून येते. अगदी स्पश्ट आणि थोडक्यात सांगायचे तर, इंटरनेट हे व्यसन झाले आहे. काही जणांना त्यावर उपचार घेणेही गरजेचे होउन बसले आहे. आजच्या लेखात आपण इंटरनेटचे व्यसन आणि त्यावरील उपचार पध्दती पाहणार आहोत.

बंधन न पाळता इंटरनेटचा, स्मार्टफोनचा वापर केला जात असेल, तर त्याला इंटरनेटचे व्यसन म्हणता येउ षकते. या अतिरीक्त वापरामुळे नातीगोती, माणसे आणि रोजची कामेही मागे पडू लागतात. सदासदैव फोन आणि फोनवर इंटरनेट सर्फींग असे सुरू असते. कितेकतास ऑनलाइन राहणे, सोषल मिडीयावर सतत राहणे, तहाण-भूक झोप विसरून ऑनलाइन गेम खेळणे सुरू होते. ही परीस्थीती इंटरनेटची किंवा मोबाईलचे व्यसन या प्रकरात मोडू षकते, असे म्हणता येईल. एक महत्वाची गोश्ट आपण समजून घेउया, की इंटरनेट हा आपल्या जगळयांच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. उदा. तुम्ही पेंईग गेश्ट म्हणून राहत असलात, तर केव्हा तरी तुम्हाला ऑनलाइन जेवण मागवावे लागणार आहे. काही अप्प दैनंदिन गरजा भागविण्यासाठी वापरावी लागू षकतात.

तुम्हाला एखादा नव्या स्टाईलचा षर्ट हवा आहे, घ्या की ऑनलाइन, पिझ्झा खायचा आहे, मग मागवा इंटरनेटवरून घरीच. या साठी फोन सुध्दा करायची गरज नाही. या सगळया गोश्टी ऑनलाइन होतात. रात्री अपरात्री झोप येत नाही, मग जवळपासच्या एखादया मीत्राच्या घरी जाण्याची किंवा त्याला फोन करण्याची ये म्हणण्याचीही गरज नाही. इंटरनेटवर ऑनलाइन गेम आहेतच.

त्यामुळे इंटरनेट वापरणारच नाही असा हट्ट आताच्या जगात चालू षकणार नाही. इंटरनेटच्या मदतीने पण अतीरीक्त वापर टाळूनच पुढे जायचे आहे, ही गोश्ट ध्यानात घ्यायला हवी. हे सारे अगदी खरे, अनिवार्य आहे. आणि म्हणूनच या टप्प्यावर मी तुम्हाला एक प्रष्न विचारणार आहे, तुम्हाला ऑनलाइन षाॅपिंग केल्याषिवाय चैन पडत नाही कां? फेसबुक पाहीले नाही तर अस्वस्थ वाटते का? तुम्हचा काॅम्पूटर वापर दैनंदिन कामांत, अभ्यासात अडथळा आणतो आहे काय? जवळच्या लोकांसी बोलतांना, संवाद साधतांना तुम्ही सतत मोबाईलवर डोकावता काय? त्यांने तुमच्या नात्यावर परीणाम होतो का? या सगळया प्रष्नांची उत्तर हो असेल तर तुम्हाला इंटरनेटचे व्यसन लागले आहे असे समजायला हरकत नाही. वैदयकीय परीभाशेत बोलायचे झाल्यास तुम्ही इंटरनेट अॅडीक्सन डिसऑर्डर च्या दिसेने जात आहात किंवा गेला आहात. या गोश्टीला कंम्पलसीव्ह इंटरनेट युज (सिआययु), प्राॅब्लेमॅटीक इंटरनेट युज (पिआययु) किंवा आय डिसऑर्डर असेही म्हणतात.

सिआयु मध्ये तुम्हाला क्षणाक्षणाला इंटरनेट वापरावेसे वाटते, एक क्षण सुध्दा तुम्हाला इंटरनेट षिवाय राहता येत नाही. तसी वेळी आली, तर तुम्हाला कमालीचे अस्वस्थ वाटायला लागते. पिआयु मध्ये तुम्हाला तुम्हच्या हातात फोन नसेल, तर चालत नाही. जिवापेक्षा फोन प्रिय, असी परिस्थीती ओढवलेली असते. आय डिसऑर्डर मध्ये तुम्हचे सर्व लक्ष फोनवर येणा-या नोटीफिकेषनकडेच असते.

समोरचा काही बोलत असेल, तर काही सांगत असेल, तर त्याहीवेळेला तुम्हचे निम्मेअधिक लक्ष फोनच्या नोटीफिकेषनकडेच असते.

या संकल्पना 1995 मध्ये डाॅ. युव्हान गोल्डवर्ग यांनी सर्वप्रथम मांडले आहे. डाॅ. गोल्डवर्ग यांनी इंटरनेट आणि जुगाराचे व्यसन या गोश्टींचा तुलनात्मक अभ्यास केला. त्या तौलनिक अभ्यासातून गोल्डबर्ग यांनी आय डिसऑर्डर हि संकल्पना मांडली. अजुनही अनेक मानसोपचार तज्ञांनी इंटरनेटचे व्यसन वर्तनुकीसी संबधीत असणारे व्यसन मानत नाही. इंटरनेटचा अती वापनर काही जणांसाठी त्रासदायक असू षकतो. या त्यावर निष्चित पणे काही उपाययोजना करणे गरजेचे असते, हे मात्र त्यांना मान्य आहे. इंटरनेटचा वापर व्यसन आहे, की दुस-या एखादया व्यसनासाठी इंटरनेटचा अतिरिक्त वापर केला जात आहे की वर्तन समस्येसी निगडीत काही गोश्टीमुळे इंटरनेटचा अतिरीक्त वापर होतो आहे, हे पाहणे महत्वाचे आहे.

ज्याप्रमाणे अमली पदार्थाचे किंवा दारूचे व्यसन सोडविण्यासाठी विषिश्ट उपचारपध्दती आहेत, त्या उपचार पध्दती (काही अंषी बदल करून) इंटरनेटचे व्यसन सोडविण्यासाठी वापरता येतात. अमली पदार्थाचे सेवन केले नाही, की त्या व्यसनी व्यक्तीला अस्वस्थता येते, तसेच इंटरनेटच्या व्यसनातही होते. उदा. ज्या व्यक्तीला जुगार खेळायचा नाद असतो, तो इंटरनेटवर सतत ऑनलाइन राहून जुगार खेळण्याच्या पध्दती, विविध ठिकाणे षोधत असू षकतो. त्यामुळे इंटरनेटचे व्यसन हे खरोखरच व्यसन आहे, की आधीच असणा-या व्यसनासाठी इंटरनेटचा वापर ही अविभाज्य गरज झाली आहे. की मुळात एखादी वर्तणुकीची समस्या आहे आणि त्यामुळे सातत्याने इंटरनेट वापरले जात आहे या प्रष्नांची उत्तरे मिळवणे

थोडेसे अवघड आहे. आधी कोंबडी की आधी अंडे? या प्रष्नांचं उत्तर मिळण्यासाठी जसा विचार करावा लागतो, त्याचप्रमाणे इंटरनेटचे व्यसन का लागते, याचा विचार करायला हवा.

नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात चार टक्के महाविदयालयीन युवक, ज्याचे वय 18 ते 20 या दरम्यान आहे, त्याचा इंटरनेटचा वापर चिंताजनक आहे. ही मंडळी इंटरनेच्या व्यसनात अडकण्याच्या पायरीवर आहेत. हे सर्वेक्षण अगदी षंभर टक्के बरोबर आहे, असे आत्तातरी म्हणता येणार नाही.

यावर उपाय काय, डिजिटल डीटाॅक्स करता येईल काय, याविशयी पुढील भागात चर्चा करू.

– डाॅ. विनोद ग. गजघाटे

ESSM Rehab - MADHUR & MADHURANGAN © 2021 All rights reserved.
Design & Developed by Nagpur Website Design

Total Visitors: counter free

WhatsApp chat